CoronaVirus : दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६५ पॉझिटिव्ह, ७९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 07:22 PM2020-06-24T19:22:51+5:302020-06-24T20:12:53+5:30
बुधवार, २४ जून रोजी अकोला आणखी चौघांच्या मृत्यूची नोंद झाली.
अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाºयांची आणि बाधित होणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, २४ जून रोजी अकोला आणखी चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ६५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतकांचा आकडा ७१ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १३०९ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात ७९ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी ३१० संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ५४ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत. उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला आहेत. तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यातील सात जण तारफैल, सात जण न्यू तारफैल, दगडीपुल येथील चार जण, खदान येथील दोन जण, बाळापूर येथील दोन जण, तर उर्वरित बार्शी टाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदास पेठ, सिव्हील लाईन, शिवर, जीएमसी होस्टेल, कळंबेश्वर, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आज सायंकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. ते खदान, शौकतअली चौक अकोट, आदर्श कॉलनी, आळशी प्लॉट, देशमुख फैल, लकडगंज, जुना तारफैल, बोरगाव मंजू, शंकरनगर, बार्शी टाकळी आणि वाशिम येथील रहिवासी आहेत.
चार जण दगावले
मंगळवारी रात्री तीन व बुधवारी दुपारी एक अशा एकूण चौघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बुधवारी दुपारी
बाळापूर येथील ४३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना नऊ जून रोजी दाखल करण्यात आले होते.दरम्यान, मंगळवारी रात्री सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष व कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
७९ जणांना डिस्चार्ज
बुधवारी सकाळी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील तिघांना घरी सोडण्यात आले. तर अन्य तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात पाठवण्यात आले आहे. दुपारी आणखी ७३ जण कोरोनामुक्त झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ जणांना घरी सोडण्यात आले. तर कोविड केअर सेंटर मधून ४५ जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ९११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३३३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३०९
मयत-७१ (७०+१)
डिस्चार्ज-९११
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३३३