CoronaVirus : नागपुरात रुग्णवाढीचा वेग मंदावला; अकोल्यात का नाही?
By राजेश शेगोकार | Published: May 27, 2020 10:38 AM2020-05-27T10:38:50+5:302020-05-27T15:01:29+5:30
जे नागपुरात जमले ते अकोल्यात का नाही, असा प्रश्न सामान्य व्यक्तीही विचारू लागले आहेत.
- राजेश शेगोकार
अकोला: अकोला : विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक चिंताजनक व चर्चेचाही ठरला आहे. अकोल्यात रुग्णवाढीचा अन् मृत्यूचाही वेग धक्कादायक आहे. एकीकडे अकोल्याची स्थिती अशी गंभीर असताना नागपूरसारख्या राज्याच्या उपराजधानीत रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहेच, सोबतच मृत्यूची संख्याही कमी आहे. त्यामुळे जे नागपुरात जमले ते अकोल्यात का नाही, असा प्रश्न सामान्य व्यक्तीही विचारू लागले आहेत.
कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ अशी अकोल्याची ओळख या वाढत्या रुग्णसंख्येमुळे झाली आहे. नागपुरात पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. अकोल्यात ७ एप्रिलपासून सुरुवात झाली. नागपूरपेक्षा तब्बल महिनाभर उशिराने रुग्ण आढळूनही अकोला आता नागपूरपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाग्रस्त होत आहे. नागपुरात अवघे आठ बळी गेले आहे, त्यामुळे अकोला हे विदर्भात सर्वाधिक कोरोनाबळीचे शहर झाले आहे. नागपुरात रुग्णांची काळजी घेतल्या गेली. ज्या परिसरात रुग्ण आढळला तो परिसर सील करून लॉकडाउनची कडक अंमलबजावणी झाली, रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट याच अनुषंगाने आरोग्य यंत्रणांनी प्रभावी काम केले, त्यामुळे अकोल्यापेक्षा पाच मोठे शहर असूनही तेथे रुग्णसंख्या नियंत्रणात आहे.
नागपुरात ७८ टक्के, अकोल्यात ५८ टक्के ‘कोरोना’मुक्त
नागपूरमध्ये ३०० रुग्णांचा टप्पा हा ६३ दिवसांत गाठला होता. अकोल्यात मात्र अवघ्या ४३ दिवसांतच ३०० च्या वर रुग्णसंख्या झाली असून, मंगळवार २६ मे रोजी अकोल्याने नागपूरलाही मागे टाकून ००० कोरोनबाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, नागपुरात शुक्रवार दुपारपर्यंत ४३२ रुग्ण तर अकोल्यात ४३५ रुग्ण व २८९ ‘कोरोना’मुक्तांची नोंद होती.