Coronavirus : कंचनपूर येथे आरोग्य विभागाचे घरोघरी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 06:25 PM2020-05-10T18:25:55+5:302020-05-10T18:59:49+5:30

रविवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.

Coronavirus: Household Survey of Health Department at Kanchanpur | Coronavirus : कंचनपूर येथे आरोग्य विभागाचे घरोघरी सर्वेक्षण

Coronavirus : कंचनपूर येथे आरोग्य विभागाचे घरोघरी सर्वेक्षण

Next

हातरुण: कंचनपुर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने गाव उरळ पोलिसांनी प्रवेशबंदी करून सील केले आहे. तसेच रविवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. यावेळी ४० संदिग्ध रुग्णांना अकोला रेफर करण्यात आले आहे. तसेच ४५ लोकांना गावात होम क्वारंटीन करण्यात आल्याची माहिती आगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयकुमार नाथक यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. गावात निजंर्तुकीकरण करण्यासाठी शनिवारी आणि रविवारी फवारणी करण्यात आली.
अकोला तालुक्यात येणाऱ्या कंचनपूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार, आगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आणि ग्रामपंचायत प्रशासनाने विविध उपाययोजना राबवित खबरदारीचा उपाय म्हणून गाव सील केले आहे. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. गावात रूग्ण आढळल्यानंतर बाहेरगावावरून येणाºया नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून कंचनपूर गावात उरळ पोलिसांचा पहारा आहे. गावातील हातावर पोट भरणाºया काही नागरिकांना सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील आणि गावातील नागरिकांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.रविवारी सकाळी कंचनपूर गावात गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या १२ पथकांनी १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात २५० घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. कंचनपूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, उरळ ठाणेदार विलास पाटील, पोलीस नायक विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे, डॉ. जाधव, डॉ. नाथक यांनी योग्य मार्गदर्शन केले.


कंचनपूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढल्याने आरोग्य विभागाने १२ पथकाद्वारे २५० घराचे सर्वेक्षण केले. गावातील ४० संशयित रुग्णांना अकोला रेफर करण्यात आले आहे. कंचनपूर गावात ४५ लोकांना होम क्वारंटीन करण्यात आले असून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत असून फवारणी करण्याचे ग्रामपंचायतीला सांगण्यात आले आहे.
- डॉ. अजयकुमार नाथक, प्रा. आ. केंद्र, आगर

 

Web Title: Coronavirus: Household Survey of Health Department at Kanchanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.