CoronaVirus : मुंबई, पुण्याहून आलेल्या ३,८५५ प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:41 PM2020-03-23T12:41:16+5:302020-03-23T12:45:19+5:30

जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांत रविवारपर्यंत ३,८५५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली

CoronaVirus: Investigation of 3855 passengers arriving from Mumbai, Pune | CoronaVirus : मुंबई, पुण्याहून आलेल्या ३,८५५ प्रवाशांची तपासणी

CoronaVirus : मुंबई, पुण्याहून आलेल्या ३,८५५ प्रवाशांची तपासणी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत ४९६६ प्रवाशी आले आहेत. रविवारपर्यंत ३,८५५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.चौघांना पुढील संदर्भ सेवेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात विदेश, मुंबई, पुण्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांत रविवारपर्यंत ३,८५५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी दिली.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणांच्या जीम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटरही बंद ठेवण्यात आले. त्याशिवाय, रेल्वे, बस, खासगी प्रवासी बससेवाही बंद करण्यात आली. या परिस्थितीत त्या शहरांतून प्रवास करून परतणाºया ग्रामस्थांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९६६ प्रवाशी आले आहेत. रविवारपर्यंत ३,८५५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यांची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर, आरोग्य सेविका, सेविका, वैद्यकीय अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत ठेवण्यात आले आहे.
त्यापैकी चौघांना पुढील संदर्भ सेवेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील लग्नसमारंभ, सोहळे, यात्रा महोत्सव स्थगित करण्याच्या सूचनाही याआधीच देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात कोरोन प्रसार प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.
ग्रामपंचायत अधिनियमातही प्रतिबंधाची उपाययोजना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १३९ अ नुसार कोरोना साथीवर नियंत्रण करण्याच्या उपाययोजना ग्रामपंचायतला कराव्या लागणार आहेत. विषाणूचा फैलाव थोपविण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करणे, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्या गृहभेटीद्वारे जनजागृती, उपचार व मार्गदर्शन करणे, शाळा, अंगणवाडी व सार्वजनिक मालमत्तांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे.

Web Title: CoronaVirus: Investigation of 3855 passengers arriving from Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.