CoronaVirus : राज्याच्या तुलनेत अकोल्यातील मृत्युदर जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:24 AM2020-06-12T10:24:15+5:302020-06-12T10:24:33+5:30

येथील मृत्यूचा दर राज्याच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी जास्त आहे.

CoronaVirus: Mortality rate in Akola higher than in the state! | CoronaVirus : राज्याच्या तुलनेत अकोल्यातील मृत्युदर जास्त!

CoronaVirus : राज्याच्या तुलनेत अकोल्यातील मृत्युदर जास्त!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, आतापर्यंत तीन हजार २८९ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे, तर अकोला जिल्ह्यात दररोज एकाचा बळी जात असून, आतापर्यंत ४३ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्यातील मृतांची संख्या कमी असली, तरी येथील मृत्यूचा दर राज्याच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासाही मिळत आहे; पण यासोबतच कोरोनामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. राज्यात गुरुवार, ११ जूनपर्यंत तीन हजार २८९ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यानुसार, राज्यातील मृत्युदर हा ३.६ एवढा आहे; मात्र या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर ४.७ असा आहे.
अकोला जिल्ह्याचा हा मृत्युदर राज्याच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी जास्त आहे. वास्तविक पाहता राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे; मात्र येथे दररोज एकाचा बळी जात असल्याने जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. मृत्यूचे हे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच आवश्यक पावले न उचलल्यास जिल्ह्याची परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: CoronaVirus: Mortality rate in Akola higher than in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.