CoronaVirus : मनपाच्या आरोग्य निरीक्षकांचा शहरातील खासगी रुग्णालयांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:49 AM2020-04-20T10:49:08+5:302020-04-20T10:49:20+5:30

रुग्णांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत.

CoronaVirus : Municipal health inspectors 'watch' at private hospitals in the city | CoronaVirus : मनपाच्या आरोग्य निरीक्षकांचा शहरातील खासगी रुग्णालयांवर ‘वॉच’

CoronaVirus : मनपाच्या आरोग्य निरीक्षकांचा शहरातील खासगी रुग्णालयांवर ‘वॉच’

Next

अकोला: महापालिका क्षेत्रात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने शहरातील प्रत्येक खासगी रुग्णालये, क्लिनिक यांना भेटी देऊन त्या ठिकाणी येणाºया रुग्णांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत. त्या पृष्ठभूमीवर आरोग्य निरीक्षकांकडून खासगी रुग्णालयांवर ‘वॉच’ ठेवल्या जात असून, यासंदर्भातील दैनंदिन अहवाल क्षेत्रीय अधिकाº­यांकडे सादर केला जात असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरात ७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर ८ एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक दोनमधील अकोट फैल भागात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला. आज रोजी प्रभाग क्रमांक ११ मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या सात झाली आहे. शहराच्या उत्तर झोनमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी उत्तर झोनमधील दोन्ही प्रभागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात होणार नाही, याबद्दल मनपा प्रशासनाच्या स्तरावर दक्षता घेतली जात आहे. याच उद्देशातून महापालिकेने शहरातील एकूण वीस प्रभागांमध्ये ठिकठिकाणी असलेल्या खासगी हॉस्पिटल तसेच क्लिनिकमध्ये आरोग्य तपासणीसाठी येणाºया रुग्णांची नोंद घेण्याचे निर्देश स्वच्छता व आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत. या कामासाठी आरोग्य निरीक्षकांना वेळोवेळी दिशानिर्देश दिल्या जात आहेत.



रुग्णांची दैनंदिन नोंद ठेवावीच लागेल!
संपूर्ण शहरात लहान-मोठी अनेक खासगी रुग्णालये तसेच क्लिनिक आहेत. रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामुळे हॉस्पिटल सुरू ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या सर्व रुग्णांची नोंद संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रुग्णांच्या संख्येत घट
संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून ३ मेपर्यंत लागू केली. दुसरीकडे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी कायम ठेवली आहे. यामुळे याचा परिणाम शहरातील रुग्णालयांवर झाल्याचे दिसून येत आहे. मनपातील आरोग्य निरीक्षकांच्या तपासणीत शहरातील हॉस्पिटलमधील रुग्ण संख्येत घसरण आल्याचे समोर आले आहे.

दैनंदिन अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे!
महापालिका क्षेत्रात एकूण २० प्रभाग आहेत. यामध्ये सर्वाधिक खासगी हॉस्पिटलची संख्या पूर्व व दक्षिण झोनमध्ये आहे. यासह पश्चिम व उत्तर झोनमध्येही लहान-मोठी रुग्णालये व क्लिनिक आहेत. या संपूर्ण रुग्णालयांना दररोज भेटी देऊन तेथील रुग्ण व त्यांच्या आजाराची माहिती घेऊन ती आरोग्य निरीक्षकांकडून संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांकडे सादर केली जात आहे.
 

 

Web Title: CoronaVirus : Municipal health inspectors 'watch' at private hospitals in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.