Coronavirus : अकोल्यात कोरोनाबधितांचा आकडा दोनशेपार; दिवसभरात २१ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 07:28 PM2020-05-14T19:28:38+5:302020-05-14T19:48:26+5:30
दिवसभरात २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २०७ झाली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रकोप वाढतच असून गुरुवार १४ मे रोजी तब्बल २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०७ सातवर पोहोचली असून, अकोलेकरांची चिंता वाढली आहे. मात्र, याच सोबत उपचारामुळे पूर्ण बरे झालेल्या १२ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ेरेड झोनमध्ये आल्यानंतर अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, गुरुवार १४ मे रोजी रुग्णांची संख्या २०७ वर पोहोचली. गत काही दिवसात अकोला शहरातील बहुतांश भाग कंटेन्टमेंट झोनमध्ये रुपांतरीत झाले असून, ही कोलेकरांसाठी धोक्याची घंटा आहे. गुरुवारी एकाच दिवशी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी प्राप्त ७४ अहवालांपैकी ११ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये दोन रुग्ण खैर मोहम्मद प्लॉट, दोन माळीपूरा येथील, तर फिरदोस कॉलनी, आंबेडकर नगर शासकीय गोदाम खदान, गोकुळ कॉलनी, तारफैल, खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहेत. यामध्ये नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये आणखी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये तीन जण आंबेडकर नगर, तर अन्य माळीपूरा, फिरदोस कॉलनी, खदान, सिटी कोतवाली, सिव्हिल लाईन्स, मोमीनपुरा, नेहरू नगर येथील रहिवासी आहेत. यामध्ये सात पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एकाने आत्महत्या केली आहे. तर गुरुवारी १२ जणांना कोरोनामुक्त करून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने आज रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात एकूण १२० रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ९८ अहवाल निगेटिव्ह कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या प्रलंबित अहवालापैकी ११९ अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी २१ अहवाल पॉझिटिव्ह , तर ९८ अहवाल निगेटिव्ह आले. अशी आहे स्थिती एकूण कोरोनाबाधित रुग्ण - २०७ अॅक्टिव्ह रूग्ण - १२० मृत्यू झालेले रुग्ण - १५ (एकाची आत्महत्या) कोरोनामुक्त - ७२