CoronaVirus : अकोला जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:05 AM2020-05-06T10:05:28+5:302020-05-06T10:05:47+5:30
मंगळवारी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दाखल झालेल्या प्रवाशांची संख्या २४८ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यात परत जाण्याची परवानगी मिळाल्याने गत दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येणाºया प्रवाशांची संख्या वाढतीच आहे. मंगळवारी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दाखल झालेल्या प्रवाशांची संख्या २४८ झाली आहे. आतापर्यंत बाहेरगावाहून जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची एकू ण संख्या २२,०११ आहे. त्यापैकी आता १,५२१ जणांना ‘क्वारंटीन’ ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक प्रवासाची साधने, तसेच खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतुकीवर बंदी घातल्याने जिल्ह्यातील अनेक कामगार, मजूर, विद्यार्थी देशभरात अडकून पडले. त्यापैकी २० हजारांपेक्षाही अधिक लॉकडाउनच्या काळातच जिल्ह्यात दाखल झाले. त्यांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीही समाप्त झाला आहे. आता जिल्ह्यात परतण्याची परवानगी मिळाल्याने अनेकजण पोहोचत आहेत. त्यापैकी २४८ प्रवाशी मंगळवारी आले.