CoronaVirus in Patur : आणखी दोन संदिग्ध रूग्ण आयसोलेशन वार्डात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:48 PM2020-04-04T18:48:56+5:302020-04-04T18:49:01+5:30

दोन वाहन चालकांना प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून अकोल्यात सर्वोपचार रूग्णालयातील आयसोलेशनच्या वार्डात हलविण्यात आले आहे.

 CoronaVirus in Patur: Two more suspected patients in isolation ward | CoronaVirus in Patur : आणखी दोन संदिग्ध रूग्ण आयसोलेशन वार्डात

CoronaVirus in Patur : आणखी दोन संदिग्ध रूग्ण आयसोलेशन वार्डात

Next

- संतोषकुमार गवई

शिर्ला : तेरा संदिग्ध आणि मेडशी येथील एका कोरोना पाझीटिव्ह रूग्णाला बडनेरा येथून खासगी वाहनाने पातूरला आणणाऱ्या दोन वाहन चालकांना प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून अकोल्यात सर्वोपचार रूग्णालयातील आयसोलेशनच्या वार्डात हलविण्यात आले आहे. या घटनेने पातुरसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
खासगी वाहनाने बडनेरा येथून पातूर येथील १३ आणि मेडशी एका जणाला आणणाºया दोन्ही वाहनचालकांची संदिग्ध म्हणून नोंद करून त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी पाठविलेल्या तेरा संदिग्धांच्या कुटूंबातील ५६ जणांची तपासणी पातुर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. पातूर तालुक्यातील तेरा संदिग्धांसोबत बडनेरा येथून एकाच खासगी वाहनातून मेडशी येथील कोरोना बाधित रुग्णासोबत आल्याने पातूर शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपरोक्त पंधरा संदिग्ध नागरिकांच्या संपर्कात आलेले कुटुंबातील व्यक्ती आणि इतर कोणकोणत्या लोकांशी यांचा संपर्क आला. याचा शोध तालुका प्रशासनाने सुरू केला आहे. शनिवारी पातुरच्या मिलिंद नगरातील नागरीकांनी नगरात येणाऱ्यांना बंदी घातली आहे. नगराच्या सर्व सिमा बंद केल्या आहेत. बाहेरुन येणाºया कुणालाही आम्ही कोरोना संकट निवारण होऊ पर्यंत मिलींद नगरमध्ये येऊ देणार नाही. असा निर्धार केला आहे.


पातुरातील रस्ते पडले ओस!
पातुरातील पंधरा संदिग्ध रूग्णांविषयीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच, ग्रामीण भागातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. गावकरी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्या पंधरा संदिग्धांच्या कुटुंबातील सदस्यांना घरातच सध्या विलगीकरण केले आहे. पंधरा जणांचे रिपोर्ट येण्यापूर्वीच पुर्वतयारी म्हणून स्थानिक प्रशासनाने या भागाचे सर्वेक्षण तातडीने सुरू केले आहे.

Web Title:  CoronaVirus in Patur: Two more suspected patients in isolation ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.