Coronavirus : खासगी रुग्णालयातील कम्पाउंडर दोन वेळा निगेटिव्ह, तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:13 AM2020-05-12T10:13:46+5:302020-05-12T10:13:58+5:30
हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होताच अत्यंत गरीब कुटुंबातील या युवकाला मानसिक धक्का बसला आहे.
अकोला: जुने शहरातील जय हिंद चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात कंम्पाउंडर म्हणून कार्यरत असणाºया एका १९ वर्षीय युवकाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत तीन वेळा घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले असता पहिल्या दोन अहवालामध्ये हा रुग्ण निगेटिव्ह असल्याचे समोर आले होते. तिसºया चाचणीमध्ये मात्र हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होताच अत्यंत गरीब कुटुंबातील या युवकाला मानसिक धक्का बसला आहे. या युवकावर सर्वोपचारमध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्ये अनेकदा बदल होत असल्यामुळे त्यावर देशभरातीलच नव्हे तर जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञांकडून बारकाईने अभ्यास केला जात आहे. रोगप्रतिकारकशक्ती आणि उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तरीही असे रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत लवकरच ठणठणीत होत असल्याचेही समोर आले आहे. त्यापूर्वी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतल्यानंतर वैद्यकीय आरोग्य प्रशासनाच्या तपासणीत अचूक लक्षणे दिसून येत नसल्याची स्थिती आहे. अर्थात नमुने घेतल्यानंतर केल्या जाणाºया तपासणीमध्ये कोणतीही त्रुटी नसली तरीही कोरोना विषाणूच्या मूळ लक्षणांचा थांगपत्ता लागत नसल्याची स्थिती आहे. असाच काहीसा प्रकार जुने शहरातील जय हिंद चौक परिसरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाºया अत्यंत गरीब कुटुंबातील १९ वर्षीय युवकासोबत घडला. जयहिंद चौकातील या रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या अधिनस्त इतर पाच कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
याच हॉस्पिटलमध्ये कार्यरत १९ वर्षीय युवकाच्या घशातील स्रावाचे नमुने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने घेतले होते. पहिल्या चाचणीमध्ये या युवकाचा अहवाल निगेटिव्ह आला. तरीही रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टरांना संशय आल्यामुळे अतिशय सुदृढ दिसणाºया या युवकाचे पुन्हा दुसºयांदा नमुने घेतले. चाचणी केली असता, दुसराही अहवाल निगेटिव्ह आला. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे या युवकाने सुटकेचा निश्वास सोडला होता; परंतु या हॉस्पिटलमधून कोरोना विषाणूचा झालेला संसर्ग लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने या युवकाचे तिसºयांदा नमुने घेऊन त्याची चाचणी केली असता तिसºया अहवालात मात्र हा युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.