CoronaVirus : अकोला शहरात आणखी ५०० 'बेड'च्या 'क्वारंटीन वार्ड'ची व्यवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 04:44 PM2020-05-31T16:44:51+5:302020-05-31T16:45:06+5:30
अकोला शहरात आणखी ५०० 'बेड'च्या 'क्वारंटीन वार्ड ' ची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.
अकोला : कोरोना विषाणूचा अकोला शहरात वाढता संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या बघता , कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी शहरात आणखी ५०० 'बेड'च्या 'क्वारंटीन वार्ड 'ची व्यवस्था करण्यात येणार आहे. संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.
अकोला शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर , कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अलगीकरण्यासाठी ३० मेपर्यंत अकोला शहरात विविध ठिकाणी १ हजार ६८० बेडच्या 'क्वारंटीन वार्ड 'ची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील वाढता संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या बघता , अकोला शहरात आणखी ५०० 'बेड'च्या 'क्वारंटीन वार्ड ' ची व्यवस्था लवकरच करण्यात येणार असून , यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. क्वारंटीन वार्डसाठी लागणाऱ्या इमारती अधिग्रहित करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.
अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग विचारात घेता , कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींकरिता शहरात आणखी ५०० बेडच्या क्वारंटीन वार्डची व्यवस्था लवकरच प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.
-संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी