CoronaVirus : बोरगावात आणखी पाच पॉझिटिव्ह; एकूण बाधित ९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:49 PM2020-07-06T17:49:56+5:302020-07-06T17:51:53+5:30
बोरगावातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
बोरगाव मंजू : येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बोरगावातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
बोरगाव मंजू येथील एक सैनिक काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता. सुटी संपल्यानंतर तो आपल्या कर्तव्यावर रुजू झाला. तेव्हा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याची जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. त्याच्या कुटुंबातील सात जणांचे स्वॅब नमुणे घेण्यात आले. या सात पैकी पाच जणांचे वैद्यकीय तपासणी अहवाल ६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे बोरगावातील एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली असून जनतेने खबरदारी घ्यावी असे आव्हान प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतच्या वतीने सदर पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरात निजंर्तुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय आरोग्य विभागाच्यावतीने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकांनी सर्वेक्षणसह जणजागृती मोहीम सुरू केली आहे