CoronaVirus : अकोल्यात आणखी सहा पॉझिटिव्ह; डॉक्टरचाही समावेश, बाधित वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 11:19 AM2020-05-02T11:19:18+5:302020-05-02T11:59:55+5:30
शनिवार २ मे रोजी यामध्ये आणखी सहा नव्या रुग्णांची भर पडली.
अकोला : अकोला शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवार २ मे रोजी यामध्ये आणखी सहा नव्या रुग्णांची भर पडली. शहरातील मोहम्मद अली मार्गावरील एक, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टरसह पाच जण असे एकून सहा जणांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शुक्रवार, १ मे रोजी उपचारसाठी आलेल्या एका ७९ वर्षीय कोरोनाबाधीत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे. या सहा रुग्णांमध्ये जयहिंद चौकातील एका डॉक्टरचा समावेश आहे. शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सलग पाचव्या दिवशी त्यात आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यातील पाच रुग्ण हे बैदपुरा येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या संपर्कातील असून, त्यामध्ये एका खासगी डॉक्टरसह त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाºयांचा समावेश आहे. तर एक रुग्ण हा मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान ७९ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता मृतांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या ४ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३८ वर पोहोचला असला, तरी प्रत्यक्षात मात्र २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरीत ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शनिवार दि.२ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवाल
आज प्राप्त अहवाल- ४७
पॉझिटीव्ह- सहा
निगेटीव्ह- ४१