CoronaVirus : अकोल्याच्या ‘व्हीआरडीएल’ लॅबवरील ताण होणार कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:29 AM2020-05-05T10:29:55+5:302020-05-05T10:30:08+5:30

मरावती येथील लॅब सुरू झाल्याने अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅबवरील मोठा ताण कमी होणार आहे.

CoronaVirus: Stress on Akola's 'VRDL' lab will be less! | CoronaVirus : अकोल्याच्या ‘व्हीआरडीएल’ लॅबवरील ताण होणार कमी!

CoronaVirus : अकोल्याच्या ‘व्हीआरडीएल’ लॅबवरील ताण होणार कमी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२ एप्रिल रोजी ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू करण्यात आली. लॅबमध्ये अकोल्यासह वाशिम, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील नमुने तपासणीचा ताण वाढला होता; परंतु अमरावती येथील लॅब सुरू झाल्याने अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅबवरील मोठा ताण कमी होणार आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील प्रलंबित चाचण्यांची संख्यादेखील कमी होण्यास मदत मिळणार आहे.
विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संदिग्ध रुग्णांची तपासणी करणे सोईचे झाले होते. अकोल्यातील लॅबमध्ये दिवसाला केवळ ८० नमुने तपासण्याची क्षमता आहे.
तर दुसरीकडे वºहाडातील पाचही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात संदिग्ध रुग्णांचे नमुने तपासणीसाठी येत आहेत.
त्यामुळे अकोल्यातील लॅबमध्ये आता अकोलाव्यतिरिक्त वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संदिग्ध रुग्णांचे अहवाल तपासले जाणार आहेत. परिणामी प्रलंबित चाचणी अहवालांची संख्याही कमी होणार असून, जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे अहवाल लवकर प्राप्त होणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील नमुने नाकारले!
मध्यंतरी जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे नमुनेदेखील अकोल्यातील लॅबमध्ये पाठविण्यात आले होते; परंतु या लॅबवरील नमुने तपासणीचा वाढता ताण लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील नमुने नाकारण्यात आल्याची माहिती आहे.

यवतमाळचेही नमुने वर्ध्याला!
अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू झाल्यानंतर येथे वाशिम, बुलडाण्यासह अमरवाती आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येत होती; परंतु अकोल्यातील लॅबवर नमुने तपासणीचा ताण वाढल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नमुने वार्धा येथील लॅबमध्ये पाठविण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावती येथील नमुनेही स्थानिक लॅबमध्येच तपासले जाणार असल्याने अकोल्यातील लॅबवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

 

Web Title: CoronaVirus: Stress on Akola's 'VRDL' lab will be less!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.