CoronaVirus : पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदिग्ध रुग्णांची चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:21 AM2020-07-27T10:21:43+5:302020-07-27T10:21:53+5:30

कोरोना चाचणीसाठी त्यांना पाच ते सहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने मानसिक ताण तणावात वाढ होत असून, अनेकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

CoronaVirus: Suspected patients tested after five days of waiting! | CoronaVirus : पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदिग्ध रुग्णांची चाचणी!

CoronaVirus : पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदिग्ध रुग्णांची चाचणी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्या संदिग्ध रुग्णांना आरोग्य विभागातर्फे संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येते, तर काही लोक स्वखर्चाने हॉटेल्समध्ये क्वारंटीन होत आहेत; मात्र कोरोना चाचणीसाठी त्यांना पाच ते सहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने मानसिक ताण तणावात वाढ होत असून, अनेकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींची वेळेतच कोरोना चाचणी होणे अपेक्षित आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणेमार्फत अशा हाय रिस्क व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जाते. शिवाय, ज्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये क्वारंटीन व्हायचे असेल, अशांनादेखील आरोग्य विभाग मान्यता देते; परंतु क्वारंटीन झाल्यापासून या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब पाच ते सात दिवसांनी घेण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
आधीच मनात कोरोनाची भीती असताना कोरोनाच्या चाचणीसाठी उशिरा नमुने घेण्यात येत असल्याने अनेक रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. नमुने घेतल्यानंतर चाचणीच्या अहवालासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी संदिग्ध रुग्णांना करावा लागतो.
दरम्यान, रुग्णांवरील मानसिक ताण वाढू लागत असून, खासगी हॉटेल्समध्ये क्वारंटीन झालेल्या रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागत आहे.


संदिग्ध रुग्णांसाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. ज्यांना स्वखर्चाने हॉटेल्समध्ये क्वारंटीन व्हायचे आहे, त्यांना परवानगी देण्यात आहे. एकदा क्वारंटीन झाल्यानंतर अशा व्यक्तींचे स्वॅब पाच दिवसानंतरच घेतलेले योग्य आहे. त्यांच्यात लक्षणे आढळल्यास रुग्णांवर तातडीने उपचार करणे सोयीस्कर ठरणार.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: CoronaVirus: Suspected patients tested after five days of waiting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला