Coronavirus : चित्रपटगृहे, तरण तलाव, नाट्यगृहे आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 11:21 IST2020-03-16T11:21:25+5:302020-03-16T11:21:31+5:30
पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.

Coronavirus : चित्रपटगृहे, तरण तलाव, नाट्यगृहे आजपासून बंद
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची होणारी गर्दी टाळण्याकरिता जिल्ह्यातील चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायाम शाळा, जीम्स , नाट्यगृहे तसेच यात्रा, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.
विविध कार्यक्रमांसाठी यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या रद्द करण्यात याव्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, मनपा आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी, तहसलदार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी आदेशात दिले आहेत.