CoronaVirus: रुग्णवाढीचे सत्र सुरुच; आणखी तीन पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३२५१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:20 PM2020-08-17T12:20:06+5:302020-08-17T12:20:09+5:30
आणखी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३२५१ वर पोहचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे सत्र सुरुच असून, सोमवार, १७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३२५१ वर पोहचली आहे.
कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असले, तरी त्यात फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभरात नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्याही वाढत असून, आतापर्यंत १३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तीघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या तीघांपैकी दोन महिला असून, एक पुरुष आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड व अकोला शहरातील गुलजारपूरा भागातील हे रुग्ण आहेत.
४६० जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २६५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४६० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.