CoronaVius Cases : आणखी एकाचा मृत्यू, २३७ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:06 PM2021-04-01T16:06:46+5:302021-04-01T16:07:03+5:30

CoronaVirus in Akola : १ एप्रिल रोजी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४५४ झाली आहे.

CoronaVius Cases: Another death, 237 new positives | CoronaVius Cases : आणखी एकाचा मृत्यू, २३७ नवे पॉझिटिव्ह

CoronaVius Cases : आणखी एकाचा मृत्यू, २३७ नवे पॉझिटिव्ह

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गुरुवार, १ एप्रिल रोजी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४५४ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४९, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १८८ अशा एकूण २३७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २७,९३७ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११९५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २४, पातूर येथील नऊ, मोठी उमरी येथील सहा, अडगाव, तेल्हारा व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, बार्शीटाकळी, गोरक्षणरोड व एमआयडीसी येथील प्रत्येकी चार, अडगाव खु., कौलखेड, मलकापूर, गंगा नगर, सुधीर कॉलनी, वणीरंभापूर, रतनलाल प्लॉट व उमरी नाका येथील प्रत्येकी तीन, रुईखेड, हिवरखेड, बायपास रोड, डाबकी रोड, पारस, लहान उमरी, सिंधीकॅम्प, भिकूनखेड व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, उन्नती खुर्द, विवरा, बेलुरा, कुटासा, आसेगाव बाजार, ऐदलापूर, नव्हेरी खुर्द ता.अकोट, चिंतलवाडी, गाडेगाव, हिंगणी बु., महागाव बु., खरप रोड, विजयनगर, पोलिस लाईन, जीएमसी, ताजनगर, आळशी प्लॉट, आदर्श कॉलनी, आपातापा रोड, राधाकिसन प्लॉट, नया अंदुरा, उरळ बु., शंकर नगर, खापरखेडा, चैतन्यवाडी, पोलिस हेडक्वॉटर, यावलकरवाडी, खदान, निपाणा, रिधोरा, अंदाज सावगी, खैर मोहमद प्लॉट, भौरद, लोणी, खोलेश्वर, गाडगे नगर, गड्डम प्लॉट, अनिकट, गीता नगर, कंळबेश्वर व समता नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

मुंडगाव येथील महिलेचा मृत्यू

कोरोनावर उपचार सुरु असलेल्या मुंडगाव ता.अकोट येथील ८६ वर्षीय महिला रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांना १८ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

 

६,०२० ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,९३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २१,४६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,०२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: CoronaVius Cases: Another death, 237 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.