अवैध बांधकामावर मनपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:19 AM2021-07-26T04:19:13+5:302021-07-26T04:19:13+5:30
अकाेटफैल चाैकात नाला तुंबला अकाेला : मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या असलेल्या अकाेटफैल चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने ...
अकाेटफैल चाैकात नाला तुंबला
अकाेला : मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या असलेल्या अकाेटफैल चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त झाले आहेत. नाल्याची तातडीने साफसफाई करण्याची गरज असून, यासंदर्भात व्यावसायिकांनी मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
चाचणीसाठी पुढाकार घ्या!
अकाेला : वातावरणातील बदलामुळे सर्दी, खाेकला, अंगदुखी आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
‘एक शेतकरी, एक झाड’ उपक्रम
अकोला : कर्मयोगी गाडगे महाराज वृक्ष संवर्धन केंद्र, भौरद यांच्या वतीने ‘एक शेतकरी, एक झाड’ हा उपक्रम राबविला जात आहे. पुरस्कारप्राप्त शाहीर मधुकर नावकार यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून वनविभागाकडून रोपे मिळविली. वनविभागाकडून रोपे मिळाल्यानंतर दीडशे शेतकऱ्यांना रोपे देऊन वृक्ष लागवड करण्यास प्रोत्साहित केले.
माेबाइल सांभाळा; दरराेज ३ तक्रारी
अकाेला : जनता भाजी बाजारासह मुख्य बाजारपेठेत माेबाइल हरविल्याच्या राेजच्या तीन तक्रारी पाेलिसांकडे येत आहेत. शहराच्या विविध भागात तसेच मध्यवर्ती बसस्थानक व जुन्या बसस्थानकावरून माेबाइल चाेरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत जाताय तर माेबाइल सांभाळा, असे आवाहन पाेलिसांकडून करण्यात येत आहे.