मनपाचे आराेग्य निरीक्षक सुस्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:02+5:302021-01-16T04:22:02+5:30
उघड्यांवरील मांस विक्री बंद करा! अकाेला: शहरातील प्रमुख रस्त्यांलगत उघड्यावर मांसविक्री केली जात आहे. मांसविक्री करण्यापूर्वी मनपाच्या आराेग्य अधिकाऱ्यांकडून ...
उघड्यांवरील मांस विक्री बंद करा!
अकाेला: शहरातील प्रमुख रस्त्यांलगत उघड्यावर मांसविक्री केली जात आहे. मांसविक्री करण्यापूर्वी मनपाच्या आराेग्य अधिकाऱ्यांकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करणे भाग आहे. तसे हाेत नसल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याची मागणी मनपाकडे गुरुवारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दुर्गा चाैकात नाला तुंबला
अकाेला: मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या असलेल्या दुर्गा चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी, तसेच हाॅस्पिटलमध्ये येणारे रुग्ण त्रस्त झाले आहेत. नाल्याची तातडीने साफसफाइ करण्याची गरज असून, भाजप नगरसेवकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता
अकाेला: जुने शहरातील शिवाजी नगरस्थित भाजी बाजार ते श्रीवास्तव चाैकपर्र्यंत भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी खाेदकाम करण्यात आले. यावेळी उजवणे शाळेच्या काेपऱ्यावर खाेदण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला नसून, यामुळे दुचाकीचालकांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पथदिवे सुरू करा!
अकाेला: प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील वस्त्यांमध्ये अद्यापही महापालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी विद्युत खांब उभारले नाहीत. यामुळे परिसरातील रहिवाशांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत असून, ही समस्या दूर करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
डम्पिंग ग्राउंडची समस्या दूर करा!
अकाेला: मनपा प्रशासनाने शहरातील दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त असताना प्रभाग क्रमांक १ मधील नायगाव परिसरात खुल्या जागेवर कचऱ्याची साठवणूक केली जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, स्थानिक रहिवाशांचा जीव धाेक्यात सापडल्यामुळे ही समस्या दूर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बुडण गाडेकर यांनी केली आहे.