पीक विमा योजनेच्या निकषात हवी सुधारणा - किशोर तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 02:27 PM2019-07-12T14:27:13+5:302019-07-12T14:28:06+5:30
२४ तासांत पीक नुकसानाचे पंचनामे करणे आणि ४८ तासांत पीक नुकसान भरपाई शेतकºयांना मिळाली पाहिजे.
- संतोष येलकर
अकोला : पीक विमा योजना त्रुटीपूर्ण असल्याने, शेतकऱ्यांचा आक्रोश कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजनेच्या निकषात सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
दुष्काळी परिस्थिती असूनही बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी पीक विम्याच्या निकषात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये सिंचन सुविधा असलेल्या शेतकºयांसाठी आणि कोरडवाहू शेतकºयांसाठी पीक विमा योजनेत वेगवेगळे निकष ठरविण्याची गरज आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक नुकसान भरपाईसाठी २४ तासांत पीक नुकसानाचे पंचनामे करणे आणि ४८ तासांत पीक नुकसान भरपाई शेतकºयांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारची सुधारणा सरकारने पीक विमा योजनेच्या निकषात करणे आवश्यक आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले. सरकारमार्फत सध्या राबविण्यात येत असलेली पीक विमा योजना त्रुटीपूर्ण असल्याने, यासंदर्भात शेतकºयांचा आक्रोश कमी करण्यासाठी पीक विमा योजनेच्या निकषात सुधारणा केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल मंडळ नव्हे, गाव घटक समजावे!
पीक विमा योजनेत पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना पीक विम्याच्या लाभासाठी पात्र ठरविण्याकरिता महसूल मंडळनिहाय क्षेत्र घटक म्हणून समजण्यात येते; मात्र शेतकºयांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी महसूल मंडळ नव्हे, तर गावनिहाय क्षेत्र हा घटक समजण्यात यावा, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.