जलकुंभनिहाय होणार जलवाहिन्यांची दुरुस्ती

By admin | Published: December 11, 2015 02:39 AM2015-12-11T02:39:46+5:302015-12-11T02:39:46+5:30

अकोला महापालिकेचा प्रयोग; खाबुगिरीला लागणार चाप.

Correction of Water Kumbh Water Station | जलकुंभनिहाय होणार जलवाहिन्यांची दुरुस्ती

जलकुंभनिहाय होणार जलवाहिन्यांची दुरुस्ती

Next

आशीष गावंडे / अकोला : वारंवार जलवाहिन्यांची दूरूस्ती करून स्वत:च्या तुंबड्या भरणार्‍या कंत्राटदार-नगरसेवक आणि मनपा कर्मचार्‍यांच्या खाबुगिरीला चाप लावण्याच्या उद्देशातून यापूढे जलकुंभनिहाय जलवाहिन्यांची देखभाल दुरूस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जलप्रदाय विभागासाठी वार्षिक अर्थसंकल्पात दरवर्षी चार ते पाच कोटींची तरतूद केली जाते. आस्थापनेसह मानधनावर कार्यरत कर्मचार्‍यांच्या वेतनावरही दोन कोटींपेक्षा जास्त तरतूद होते. मंजूर रकमेचा पद्धतशीरपणे सफाया झाल्यानंतर इतर निधीसुद्धा जलप्रदाय विभागातील कामांसाठी वळता केला जातो. मुख्य जलवाहिन्यांसह प्रभागातील जलवाहिन्या, हातपंप, सबर्मसिबल पंप, व्हॉल्व्हची देखभाल-दुरुस्ती एकदा नव्हे, तर वारंवार केली जाते. निकृष्ट दर्जाचे पीव्हीसी पाइप व इतर दर्जाहीन साहित्याचा बिनधास्त वापर केला जातो. अशा कामांच्या व्यवस्थित फाइली, रेकॉर्ड तयार करून कोट्यवधीच्या देयकांवर ताव मारण्याची पद्धत मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासाठी कंत्राटदार-नगरसेवकांसह जलप्रदाय विभागात मोठी साखळीच कार्यरत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १३ जलकुंभ असले तरी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी प्रभागनिहाय कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून, काही ठिकाणी स्वत: नगरसेवकच ही कामे करतात. नियमानुसार चालणारा हा गोरखधंदा लक्षात आल्यानंतर महापालिका आयुक्त अजय लहाने, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी प्रभागनिहाय कामे देण्यावर टाच आणत यापुढे जलकुंभनिहाय जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Correction of Water Kumbh Water Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.