लाचखोर ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:20 PM2019-12-10T12:20:22+5:302019-12-10T12:20:27+5:30
ग्रामसेवक रवींद्र राम गंडाळे यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट तालुक्यातील रौंदळा येथील ग्रामसेवकाने प्लॉटची नोंदणी व नमुना आठ ‘अ’ देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने त्याच्यावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवक रवींद्र राम गंडाळे यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला.
ग्रामसेवक रवींद्र गंडाळे याने त्यांच्या प्लॉटची नोंदणी करण्यासाठी ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने अकोला एसीबीकडे धाव घेतली.
पडताळणीदरम्यान ग्रामसेवक गंडाळे याने ४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी ग्रामसेवक गंडाळे यांनी अकोल्यातील दामले चौकात लाच स्वीकारली. त्यावेळी त्याला रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर करण्यात आला. त्यानुसार ग्रामसेवक गंडाळे यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश देण्यात आला. निलंबन काळातील मुख्यालय तेल्हारा पंचायत समिती देण्यात आले आहे.