चान्नी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टचार; चौकशी थंड बस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:52 AM2020-12-04T04:52:23+5:302020-12-04T04:52:23+5:30

सचिव आर. के. बोचरे चौकशीच्या वेळेत गैरहजर राहत असल्याने चौकशी करण्यासाठी चौथ्यांदा म्हणजे १ डिसेंबर रोजीची तारीख देण्यात आली ...

Corruption in Channi Gram Panchayat; Inquiry in the cold! | चान्नी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टचार; चौकशी थंड बस्त्यात!

चान्नी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टचार; चौकशी थंड बस्त्यात!

Next

सचिव आर. के. बोचरे चौकशीच्या वेळेत गैरहजर राहत असल्याने चौकशी करण्यासाठी चौथ्यांदा म्हणजे १ डिसेंबर रोजीची तारीख देण्यात आली होती. १ डिसेंबर रोजी चौकशी समितीचे सदस्य विस्तार अधिकारी आर. एस. गवई, सहाय्यक लेखाधिकारी व्ही. पी. राठोड, कनिष्ठ अभियंता विजय शिंदे व आर.के. बोचरे उपस्थित होते; मात्र सचिवांनी रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नसल्याने चौकशी करण्यात आली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

--------------------------

सचिव आर.के. बोचरे यांनी चौकशीसाठी रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे चौकशी करणे शक्य झाले नाही, तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.

-आर.एस. गवई, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, पातूर

Web Title: Corruption in Channi Gram Panchayat; Inquiry in the cold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.