निंभोरा ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 10:30 AM2020-10-19T10:30:58+5:302020-10-19T10:35:09+5:30

Fraud in Grampanchayat Akola District भ्रष्टाचार झाल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे.

Corruption of crores of rupees in Nimbhora Gram Panchayat! | निंभोरा ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार!

निंभोरा ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार!

Next
ठळक मुद्देगट विकास अधिकाऱ्याच्या अहवालामध्ये सरपंच दोषी आढळून आले आहेत. गटविकास अधिकाऱ्याने दिला पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा आदेश.
भनगर: निभोरा गट ग्रांपचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवास पोलिसात फिर्याद देण्याचा आदेश १२ आक्टोबर रोजी दिला आहे. येथून जवळच असलेल्या निभोरा गट ग्रांमपचायतमध्ये कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रा.पं. सदस्य कल्पना भगत यांनी ६ ऑगस्ट २०१८ मध्ये पालकमंत्र्यांच्या जनता दरबारमध्ये केली होती. त्यानुसार गट विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून १० फेब्रुवारी २०२० रोजी पूर्ण केली. याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोलाकडे दिला आहे. गट विकास अधिकाऱ्याच्या अहवालामध्ये सरपंच दोषी आढळून आले आहेत. तरीही अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर ग्रा.पं. सदस्याने ७ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी तक्रार देऊन दोषीविरुद्ध कारवाइ करण्याची मागणी केली होती. अखेर १२ आक्टोबर रोजी गट विकास अधिकाऱ्यांनी याप्रकरणी ग्रामपंचायत सचिवास दोषिंविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा आदेश प्राप्त झाला असून, याबाबत वरिष्ठांशी सविस्तर चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल.- अनंत वावगे, ग्रा.पं. सचिव, निंभोरा.

Web Title: Corruption of crores of rupees in Nimbhora Gram Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.