१०० काेटींचा खर्च, अकाेल्यात ४०० पाेलिसांना लक्झरीअस निवासस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:37 AM2021-07-26T10:37:12+5:302021-07-26T10:37:28+5:30
Luxurious accommodation for 400 Police in Akola : नागपूरनंतर अकाेल्यात अशा प्रकारची भव्य वास्तू पाेलीस कर्मचाऱ्यांना रहिवासासाठी मिळणार आहे़.
- सचिन राऊत
अकाेला : अकाेला जिल्ह्यात पाेलिसांसाठी असलेल्या जवळपास सर्वच वसाहती माेडकळीस आल्यानंतर नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या पाेलीस वसाहतीमधील ३७८ लक्झरीअस निवासस्थानांचे आता लवकरच पाेलीस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे़. सुमारे १०० काेटी रुपयांचा खर्च करून ही निवासस्थाने बांधण्यात आली असून विदर्भातील नागपूरनंतर अकाेल्यात अशा प्रकारची भव्य वास्तू पाेलीस कर्मचाऱ्यांना रहिवासासाठी मिळणार आहे़. या ठिकाणी २ आणि ३ बीएचकेचे लक्झरीअस घरे पाेलिसांना देण्यात येणार असून प्रत्येक घराची आता पाेलीस अधिकाऱ्यांकडून तपासणी सुुरू करण्यात आली आहे़.
साडेतीन लाख स्क्वेअर फूट बांधकामावर या आहेत सुविधा...
तीन लाख ५० हजार स्क्वेअर फुटांवर बांधण्यात आलेल्या या इमारतींमध्ये २ आणि ३ बीएचके फ्लॅट आहेत़. या निवासस्थानांतील रहिवाशांसाठी जिम, गार्डन, मंदिर, आकर्षक झाडे यासह अनेक सुविधा या वसाहतीमध्येच देण्यात आलेल्या आहेत़ ५० ते ६० लाख रुपयांचा फ्लॅट घेतल्यानंतर ज्या सुविधा मिळणार नाहीत, त्यापेक्षा अधिक सुविधा या पाेलीस वसाहतींमध्ये ठेवण्यात आल्या आहेत़.
सात मजल्यांच्या सात इमारती
पाेलीस वसाहतींमध्ये भव्य-दिव्य अशा सात इमारती असून प्रत्येक इमारत सात मजल्यांची आहे़. काही इमारतींत ३ बीएचके फ्लॅट असून काही इमारतींत २ बीएचके फ्लॅट आहेत़ अकाेल्यात सर्वाधिक उंचीची इमारत म्हणूनही याच इमारतींची आता नाेंद हाेणार आहे़.
पाच वर्षांचे मेटेनन्स कंपनीकडे
दरम्यान, पाेलीस वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या वसाहतीला बाहेरून किंवा आतून काहीही झाल्यास त्याची दुरुस्ती करून देण्याचे म्हणजेच मेंटेनन्सचा पाच वर्षांचा खर्च ही बांधकाम करणारी कंपनी करणार आहे़. निवासस्थानांच्या आतमध्ये रहिवाशांनी कुठेही खिळे ठाेकून किंवा रंग खराब केल्यास ती जबाबदारी संबंधित पाेलिसांची राहणार आहे़.
या मैदानांचाही समावेश
पाेलीस वसाहतीच्या आतमध्येच कबड्डी, बास्केटबाॅल, व्हाॅलिबाॅल, खाे-खाे, बॅडमिंटन खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले आहे़ या साेबतच २०० मीटर अंतराचा वाॅकिंग ट्रॅकही या ठिकाणी तयार करण्यात आला असून वाचनासाठी लायब्ररी व रीडिंग रूमही बनविण्यात आली आहे़. तसेच काैटुंबिक कार्यक्रमांसाठी फंक्शन हाॅलही या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे़. त्यामुळे ही वसाहत अकाेल्यातील सर्वात भव्य आणि सुंदर असल्याची माहिती आहे़.
या अधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांच्या संकल्पनेत तसेच कार्यकाळात सुरू झालेल्या या वसाहतीचे बांधकाम पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे़. त्यामुळे ही निवासस्थाने लवकरच पाेलीस व त्यांच्या कुटुंबीयांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ तत्कालीन पाेलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनीही ही इमारत तातडीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न केले़.