राज्यात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:54 PM2020-04-25T12:54:45+5:302020-04-25T12:54:53+5:30
यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते.
अकोला: राज्यात कापूस आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे; परंतु यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; पण हे सर्व बियाणे उपलब्धता आणि शेतकºयाची आर्थिक स्थिती यावर अवलंबून आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि शेतकºयांचे बिघडलेले अर्थचक्र याचा परिणाम यावर्षी खरीप हंगामावर जाणवण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. खरिपात घेण्यात येणाºया पिकाचाही आढावा घेण्यात येत आहे. राज्यात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचे क्षेत्र ८० लाख हेक्टर आहे. गतवर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस बियाणे पेरणी करण्यात आली होती. यात विदर्भात १८ लाख हेक्टर क्षेत्र होते. गतवर्षी कापूस पीक बºयापैकी आले. त्यामुळे कापूस बियाण्याची उपलब्धता आहे; परंतु सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन बियाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता किती, यावर यावर्षी सोयाबीन पेरणीचे क्षेत्र अवलंबून आहे.
या सर्व पृष्ठभूमीवर यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते. टाळेबंदी आणि शेतकºयांचे झालेले अपरिमित नुकसान, या सर्व आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी पीक कर्जाचे आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे; परंतु विदर्भात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापूस पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी शेतकºयांना करावी लागेल.
- डॉ. के. एस. बेग,
कापूस तज्ज्ञ,
स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृ षी विद्यापीठ, परभणी.