कापसाचे क्षेत्र वाढणार!

By admin | Published: May 25, 2014 12:57 AM2014-05-25T00:57:04+5:302014-05-25T01:04:45+5:30

अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सात ते आठ लाख हेक्टर वाढण्याची शक्यता आहे.

Cotton area will grow! | कापसाचे क्षेत्र वाढणार!

कापसाचे क्षेत्र वाढणार!

Next

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सात ते आठ लाख हेक्टर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याकरिता १६0 लाख बीटी कापसाच्या पाकिटांची गरज भासणार आहे. या दृष्टीने बियाणे कंपन्यांनी व कृषी विभागाने नियोजन केले असल्याचे सांगितले जात असले तरी बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकावर भर दिला होता. त्यामुळे एकट्या अमरावती विभागात जवळपास १७.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. तथापि अतवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा फटका बियाण्यांना बसला, परिणामी यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी विभाग पातळीवर वर्तविण्यात येत होती. ती शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारीवरू न काहीअंशी खरी वाटत आहे. अकोला जिल्हय़ात यावर्षी ४0 हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन केले आहे; परंतु हे नियोजन केवळ कागदावर असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केली आहेत; परंतु अजूनपर्यंत शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हय़ात ४0 हजार हेक्टर कापसाचे क्षेत्र वाढणार आहे; असा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांना हव्या असलेल्या बीटी कापसाची मागणी बाजारात केली आहे; परंतु नेमके तेच बियाणे शेतकर्‍यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. परप्रांतातील काही कापसाच्या जातीचा मध्यंतरी प्रचार करण्यात आला आहे. बाजारात हवे ते बियाणे मिळणे कठीण झाल्याने काही शेतकर्‍यांनी त्या कापूस बियाण्यांची चौकशी करणे सुरू केले आहे.

Web Title: Cotton area will grow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.