सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये होणार कापूस खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:03 AM2020-04-18T11:03:47+5:302020-04-18T11:06:16+5:30
बाजार समिती परिसरात कापूस खरेदीस परवानगी देण्यात आली आहे.
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने ‘लॉकडाउन’ केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदीही बंद आहे. सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणे शक्य नसल्याने बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या व्यापारी यांना कापूस खरेदी करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे मूर्तिजापूर वगळता इतर बाजार समित्यांच्या अंतर्गत २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरू होणार आहे.
जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढतील, या आशेवर कापूस घरातच साठवून ठेवला आहे. २२ मार्चपासून लॉकडाउन सुरू असल्याने शेतकºयांना कापसाची विक्री करता येत नसल्याचे चित्र आहे. सीसीआयचीही कापूस खरेदी बंद आहे. ती पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याने बाजार समिती परिसरात कापूस खरेदीस परवानगी देण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील सीसीआयकडे नोंदणी केलेल्या शेतकºयांकडूनच कापूस खरेदी होणार आहे. तसेच शेतकºयांना सातबारा, बँक पासबुक व आधार कार्ड खरेदी केंद्रावर आणावे लागणार आहे. शेतकºयांनी १८ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत नोंदणी करून टोकन घ्यावे, शेतकºयांनी फोनवरच नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अकोट केंद्रावर नोंदणी झालेल्या २७०० शेतकºयांच्या कापसाची खरेदी झाल्यावर नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.