अकोल्यातून स्वित्झर्लंडला पाठविणार कापूस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:52 PM2019-09-07T12:52:18+5:302019-09-07T12:52:35+5:30

स्वित्झर्लंडमधील एका संशोधन संस्थेसोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सामजंस्य करार केलेला आहे.

Cotton to be shipped from Akola to Switzerland! | अकोल्यातून स्वित्झर्लंडला पाठविणार कापूस!

अकोल्यातून स्वित्झर्लंडला पाठविणार कापूस!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्वित्झर्लंडच्या हवामानाला अनुरू प कापडांची गरज भागविण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लांब धाग्याच्या सेंद्रिय कापसावर संशोधन सुरू करण्यात आले आहे. या कापसाच्या बीजोत्पादनानंतर उत्पादन घेण्यात येणार असून, स्वित्झर्लंडला हा कापूस पाठविला जाणार आहे.
स्वित्झर्लंडमधील एका संशोधन संस्थेसोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सामजंस्य करार केलेला आहे. संशोधन व इतर उच्च शिक्षण, तंत्रज्ञानासंबंधीचे आदान-प्रदान करता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. याच अनुषंगाने स्वित्झर्लंडमधील आणखी एका कंपनीसोबत या कृषी विद्यापीठाने सेंद्रिय कापूस उत्पादनासंदर्भात करार केला असून, त्यावर संशोधन सुरू करण्यात आले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून या कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर सेंद्रिय कापूस पध्दतीने उपाय योजना करण्यात येत आहेत. यानुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी स्वित्झर्लंड येथे जाऊन एका कार्यशाळेत भाग घेतला. त्यांच्या मते स्वित्झर्लंडमधील वातावरण थंड असून, या वातावरणाला अनुरू प सुती पोशाख, कापडांची मागणी तेथे आहे. विशेष म्हणजे, सेंद्रिय कापूस त्यांना हवा आहे. तेथील एक कंपनी सेंद्रिय शेतीवर काम करीत आहे. त्या कंपनीने भारतातील कापसाची माहिती घेतली असता, त्यांना विदर्भातील कापूस आवडला असून, याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची निवड केली आहे.

स्वित्झर्लंडसोबत आपण सामंजस्य करार केलेला आहे. याचाच एक भाग म्हणून एका सेंद्रिय शेतीवर काम करणाऱ्या तेथील कंपनीला आपण सेंद्रिय लांब धाग्याचा कापूस देणार आहोत. यानुषंगाने विद्यापीठात संशोधन सुरू आहे. यामुळे विदर्भातील कपाशीला आंतरराष्टÑीय बाजारपेठ उपलब्ध होऊन कपाशीला चांगली मागणी वाढेल.
- डॉ. विलास भाले, कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: Cotton to be shipped from Akola to Switzerland!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.