राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पीक; मराठवाड्यात क्षेत्र घटले, विदर्भात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:51 PM2019-08-06T13:51:48+5:302019-08-06T13:52:04+5:30
अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे
अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे. अल्प पावसामुळे मराठवाड्यातील कापसाचे क्षेत्र घटले तर विदर्भातील कापसाचे क्षेत्र मात्र ७० हजार हेक्टरने वाढले आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञाकरवी वर्तविण्यात येत आहे.
यावर्षी राज्यात ४१ लाख ९१ हजार १४४ हेक्टरवर कपाशी पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. तथापि ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर म्हणजेच १०० टक्के पेरणी आटोेपली आहे. मराठवाड्यात मात्र कपाशीचे क्षेत्र घटले असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात कापूस पेरणीवर परिणाम झाला आहे. मराठवाड्यात यावर्षी १७ लाख ७५ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात १४ लाख ८८ हजार हेक्टरवरच पेरणी झाली. उत्तर महाराष्ट्र खान्देशात ८ लाख ६० हजार १०१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी केली, तर विदर्भात सर्वात जास्त १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मराठवाड्यातील कपाशी पेरणीची झीज विदर्भ,खान्देशाने भरू न काढल्याने आकडेवारीवरू न दिसते.
विदर्भातील अमरावती विभागातील शेतकºयांनी यावर्षी मूग,उडीद पिकांची पेरणी न करता कापूस पेरणीवर भर दिला तर नागपूर विभागातील शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कापूस पीक पेरणी केली.पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी शेतकºयांनी हा निर्णय घेतल्याचे कृषी तज्ज्ञाकरवी सांगण्यात येत असले तरी मागच्यावर्षीही पाऊस कमीच होता. तथापि, मागच्यावर्षीच्या खरीप हंगामातील कपाशी पिकाला जे दर मिळाले ते समाधानकारक होते. बोंडअळीचा प्रादुर्भावही कमी असल्याने कापसाची प्रत चांगली होती. यावर्षी मराठवाडा व विदर्भात खूपच कमी पाऊस झाला. विदर्भात कापूस पीक पेरणीला विलंब झाला. त्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारली.आताही पावसात दम नसून, काही भागात तुरळक तर काही भागात काहीच पाऊस नाही, अशी स्थिती आहे.याचा परिणाम कापूस उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
अगोदर पाऊस लांबल्याने उशिरा पेरणी केलेल्या कपाशीची वाढ खुंटली होती. आता १२ दिवसांपासून ढगाळ वातावरण व अधूनमधून तुरळक पाऊस असून, शेतकºयांना पिकावर फवारणी करता येत नसल्याने अळ््या, कि डींचा प्रादुुर्भाव वाढत आहे.असेच वातावरण आणखी राहिल्यास कपाशी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
डॉ.मोहन खाकरे,
माजी ज्येष्ठ विद्यावेत्ता,शास्त्रज्ञ,
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.