कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटींचे चुकारे अदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:05 PM2020-05-23T12:05:08+5:302020-05-23T12:05:21+5:30
आतापर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे करण्यात येत आहेत.
अकोला: महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाला एक हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले असून, आतापर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात ८१ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत; परंतु पणन महासंघाकडील पैसा संपल्याने शेतकऱ्यांचे ४०० कोटी रुपयांचे चुकारे पणन महासंघाकडे थकले होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली होती. २० एप्रिलनंतर शेतमाल विक्री-खरेदी करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर पणन महासंघाने राज्यात पुन्हा ८१ कापूस खरेदी केंदे्र सुरू केली असून, या काळात ९ लाख क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे. पणन महासंघाने अगोदर २,३०० कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले होते; परंतु कापूस खरेदीपोटी शेतकºयांना २,९०० कोटी रुपयांचे चुकारे अदा करायचे होते. त्यातील २,५०० कोटी रुपयांवर चुकारे अदा करण्यात आले होते; परंतु पैसा संपल्याने पणन महासंघाने एक हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठीचे पाऊल उचलले होते. हे कर्ज अखेर पणन महासंघाला मिळाले असून, चुकारे अदा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपये अदा करण्यात आले असून, उर्वरित चुकारे करण्यात येत आहेत. पणन महासंघाने आतापर्यंत ६४ लाख क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे. टाळेबंदीच्या काळात ९ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. पणन महासंघाने कापूस नोंदणी बंद केली असली तरी सध्या कापूस खरेदी सुरू आहे.
दरम्यान, मार्जिन मनी म्हणून देण्यात येणारे ९६ कोटी रुपये शासनाने दिले नाहीत, ते देण्याची गरज आहे. कारण एक हजार कोटी रुपयेदेखील पुरणार नसल्याचे पणन महासंघाचे म्हणणे आहे.
पणन महासंघाला बँकेकडून एक हजार कोटी रुपयांचे कर्ज प्राप्त झाले असून, शेतकºयांना आतापर्यंत ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे केले आहेत. उर्वरित चुकारे देण्यात येत आहेत. तद्वतच इतरही खर्च जास्त आहे. त्यामुळे आणखी पैशाची गरज आहे.
--अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई.