कापसाने ओव्हरलोड भरलेला मालवाहू उलटला; तीन ठार, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:50 AM2020-12-04T04:50:49+5:302020-12-04T04:50:49+5:30
बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता येथून कापूस भरून घेऊन जाणारा मिनीडोअर मालवाहू क्रमांक एमएच ०४ जीसी ९४२० हा तेल्हाऱ्याकडे अंदुरा-आडसूळ ...
बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता येथून कापूस भरून घेऊन जाणारा मिनीडोअर मालवाहू क्रमांक एमएच ०४ जीसी ९४२० हा तेल्हाऱ्याकडे अंदुरा-आडसूळ मार्गाने जात होता. अंदुरानजीक मालवाहू वाहनाचे एक्सल तुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २८ एव्ही ३२८८ला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, ओव्हरलोड असलेला मिनीडोअर मालवाहू उलटला. या खाली तीन जण दबल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृृतांमध्ये दुचाकीस्वार प्रल्हाद किसन अडकणे (६५) रा.दसरा नगर शेगाव, तर मालवाहू वाहनांवर बसलेले जाबीर शहा शब्बीर शहा (३२)आशा नगर अकोट व शे.मोबीन शे. इम्रान (३०), अकबरी प्लॉट अकोट यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच उरळ व तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी व अंदुरा सरपंच संजय वानखडे, आडसूळ सरपंच सदानंद नवलकार, पोलीस पाटील ज्ञानदेव रोहणकर, तलाठी सतीश कराड, तलाठी काकडे, कोतवाल राजू डाबेराव, शुभम नवलकार, शिवहरी बाहे यांनी सहकार्य करून वाहतूक सुरळीत केली. (फोटो)
--------------------------------------------------------