देशात कपाशी पेरा घटला; उत्पादनावर परिणाम, यंदा चांगल्या भावाची अपेक्षा

By रवी दामोदर | Published: July 30, 2023 11:26 AM2023-07-30T11:26:45+5:302023-07-30T11:27:07+5:30

देशात गतवर्षी ११ कोटी ५ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा ११ कोटी ९ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी  झाली आहे.

Cotton planting in the country decreased; Impact on production, expect good prices this year | देशात कपाशी पेरा घटला; उत्पादनावर परिणाम, यंदा चांगल्या भावाची अपेक्षा

देशात कपाशी पेरा घटला; उत्पादनावर परिणाम, यंदा चांगल्या भावाची अपेक्षा

googlenewsNext

अकोला : यंदाही मान्सून लांबल्याने देशात शेतकऱ्यांच्या भरवशाचे पीक असलेल्या कपाशीचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा १.१६ लाख हेक्टरने घटल्याचे चित्र आहे. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात कपाशीचे सरासरी क्षेत्र १२.८ कोटी असून, त्यापैकी २८ जुलैपर्यंत ११.६ कोटी  हेक्टरवरच पेरणी झाली आहे. 

सोयाबीनचे क्षेत्र ४.२८ लाख हेक्टरने वाढले -
देशात गतवर्षी ११ कोटी ५ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा ११ कोटी ९ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी 
झाली आहे.

देशात अशी झाली पेरणी (क्षेत्र हेक्टर लाखात)
पीक    सरासरी क्षेत्र    गतवर्षी (पेरणी)    यंदा (पेरणी)        वाढ/घट 
कपाशी     १२८.६७        ११७.९१    ११६.७५            १.१६ घट 
सोयाबीन     ११७.४४        ११५.६३    ११९.९१        ४.२८ वाढ
 

Web Title: Cotton planting in the country decreased; Impact on production, expect good prices this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.