कापसाचे दर शंभर रू पयांनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:12 PM2020-01-25T18:12:49+5:302020-01-25T18:12:53+5:30
मागील आठवड्यात प्रतिक्ंिवटल ५,५५० रू पयांपर्यंत पोहोचलेले दर या आठवड्यात सरासरी ५,३६० रू पये आहेत.
अकोला : कापसाची आवक वाढल्याने दरात शंभर रू पयांची घट झाली आहे.आजमितीस हे दर प्रतिक्ंिवटल सरासरी ५,३६० रू पयांवर आले आहेत.सद्यस्थिती कापसाचे पीक जोरदार आले आहे.परंतु पश्चिम विदर्भात मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ सुरू आहे.
राज्यात यावर्षी ४२ लाख हेक्टरवर कापूस बियाणे पेरणी करण्यात आली आहे.सुरू वातीला पावसाला विलंब झाला त्यामुळे पेरणीला विलंब झाला होता.हे पीक वाढीच्या अवस्थेत असताना सतत पाऊस सुरू राहिल्याने फुले व पात्या गळण्याचे प्रकार घडले.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावही वाढला आहे. पाऊस ओसरल्यानंतर आता मात्र कापसाच्या झाडांना चांगला बहर आला असून, सर्वत्र शेत पांढरी दिसत आहेत.त्यामुळे कापूस वेचणी सुरू असून, बाजारात आवक वाढली आहे.आजमितीस ही आवक राज्यात तीन लाख क्ंिवटल आहे.आवक वाढल्याने दर शंभर रू पयांनी कमी झाले आहेत. मागील आठवड्यात प्रतिक्ंिवटल ५,५५० रू पयांपर्यंत पोहोचलेले दर या आठवड्यात सरासरी ५,३६० रू पये आहेत.तर कमीत कमी दर प्रतिक्ंिवटल ५,२८० रू पये आहेत. परतीचा पाऊस गतवर्षी नोव्हेंबर महिन्यातही सुरू होता.या वातावरणामुळे कापसांची बोंड फुलण्यास विंलब झाला.सद्यस्थितीत वातावरण पोषक असून,बोंडे फुटून कापूस बाहेर येत आहे.शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला सुरू वात केली आहे.तथापि पश्चिम विदर्भात मजूर मिळत नसल्याने शेतकरी मजुरांच्या शोधात आहेत. या भागात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.
राज्यात कापसाची आवक वाढली असून, दररोज ३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी करण्यात येत आहे. आवक वाढल्याने क ापसाचे दर शंभर रू पयांनी कमी झाले आहेत.
- बंसत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.