कापसाचे दर दोनशे रुपयांनी घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 02:26 PM2018-11-28T14:26:07+5:302018-11-28T14:26:17+5:30
अकोला: यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असताना राज्यातील कापसाचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे.
अकोला: यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असताना राज्यातील कापसाचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत देशात दररोज १ लाख ५० हजार, तर राज्यात ३५ हजार गाठींची आवक सुरू आहे.
यावर्षी कापूस पीक पेरणीवर परिणाम झाला असून, राज्यात १० टक्के कापसाचे क्षेत्र घटले आहे. या परिस्थितीत राज्यात सध्या तरी दररोज १ लाख ७५ हजार क्विंटल (३५ हजार गाठी) कापसाची आवक सुरू आहे. अनेक भागात कापूस वेचणी आता संपण्याच्या मार्गावर आहे. पाऊस कमी झाल्याचा परिणाम कापूस पिकांवर झाला आहे. पश्चिम विदर्भात शेकडो शेतकºयांनी कापसावर नांगर फिरवला असून, अनेक ठिकाणी कापसाची एक वेचणी झाल्यानंतर कापूस पीक संपले. भारी व काळ््या जमिनीत कापूस टिकून आहे. तथापि, तेथेही शेवटची कापसाची वेचणी आहे. त्यामुळे बाजारात कापसाची सध्या जी आवक आहे ती अशीच राहील, असे सांगता येत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. असे असताना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये वाढलेले दर अचानक २०० ते ३०० रुपयांनी कमी झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. पश्चिम विदर्भातील अकोट बाजारात सध्या हे दर घटून प्रतिक्विंटल ५,७०० ते ५,८०० रुपयांपर्यंत आहेत. काही भागात हेच दर ५,५०० ते ५,६५० रुपयांपर्यंत घटले आहेत.
कापसाची आवक सध्या राज्यात ३५ हजार गाठी आहे; पण दर दोन दिवसात २०० रुपयांची घटले आहेत. एक-दोन दिवसानंतर यात काय बदल होतो, त्यानंतरच पुढील दर काय असतील, हे कळेल.
- बसंत बाछुका,
कापूस उद्योजक, अकोला.