कापसाचे दर वाढणार; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:31 AM2019-04-12T06:31:17+5:302019-04-12T06:31:29+5:30

फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.

Cotton prices to go up; Experts have expressed concern | कापसाचे दर वाढणार; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

कापसाचे दर वाढणार; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Next

अकोला : कापसाचे दर आणखी २०० ते ३०० रुपयांनी वाढण्याची शक्यता कापूस व्यापारी, तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या बाजारात प्रतिक्ंिवटल ६,५०० ते ६,७५० रुपये दर आहेत.


फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मार्च महिन्यात या दरात सुधारणा होऊन प्रतिक्विंटल दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे सहा हजार रुपये दर होताच व्यापाऱ्यांनी गावा-गावात जावून कापूस खरेदी केला. ज्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठीची सोय आहे त्यांनी मात्र दर वाढतील या प्रतीक्षेत कापूस घरीच ठेवला होता. दरम्यान, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होताच पुन्हा कापसाच्या दरात दमदार सुधारणा झाली असून, हे दर प्रतिक्ंिवटल ६,५०० ते ६,७५० रुपयांपर्यंत पोहोचले. अकोला जिल्ह्यातील अकोेट भागात तर शेतकºयांना प्रतिक्विंटल सात हजार रुपये मिळाले. सध्या श्ोतकºयाकडे कापूस नसल्याने या दरवाढीचा फायदा शेतकºयांना नव्हे तर व्यापाºयांना होणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

देशात आजमितीस दोन कोटी ६५ लाख कापसाची आवक झाली असून, राज्यात जवळपास ७० लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. आता दर वाढल्याने शेतकºयांनी कापूस विक्रीस काढला आहे. आणखी २०० ते ३०० रू पयांनी दर वाढण्याची शक्यता आहे.
- बसंत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.

Web Title: Cotton prices to go up; Experts have expressed concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस