‘पणन’कडे कापसाचा ओघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:28 PM2019-12-03T12:28:16+5:302019-12-03T12:29:06+5:30

१४ केंद्रावर २० हजार क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांनी पणन महासंघाला विकला आहे.

Cotton pruchsing increase at Market | ‘पणन’कडे कापसाचा ओघ!

‘पणन’कडे कापसाचा ओघ!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाजारात कापसाचे दर घटल्याने महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे कापसाची आवक सुरू झाली असून, तीन दिवसात राज्यातील १४ खरेदी केंद्रावर २० हजार क्विंटलवर कापसाची खरेदी झाली आहे.
गत काही वर्षांपासून बाजारात चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाला कापूस विकणे बंद केले होते. यावर्षी बाजारात दर घटल्याने पणन महासंघाला चांगले दिवस आले असून, गत तीन दिवसात केवळ १४ केंद्रावर २० हजार क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांनी पणन महासंघाला विकला आहे. सुरुवातीला नाफेडचा उपअभिकर्ता म्हणून कापूस खरेदी करणाºया पणन महासंघाने मागील चार वर्षापासून भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाचा उपअभिकर्ता म्हणून आधारभूत किमतीने कापूस खरेदी करीत आहे. यावर्षी ५० खरेदी केंद्र सुरू करणार आहे. सद्यस्थितीत पाच झोनमध्ये १४ खरेदी केंद्र सुरू केली आहेत. यातील यवतमाळ झोनमध्ये ३ हजार ३१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तसेच अमरावती येथे ३२८ क्विंटल, खामगाव येथे २ हजार ७४० क्विंटल, औरंगाबाद झोनमध्ये ५ हजार ९०६ क्विंटल, परळी ३ हजार २५६ क्विंटल असा १५ हजार २६१ क्विंटल असा रविवार, १ डिसेंबरपर्यंत १५ हजार २६१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. सोमवारी मोजणीसाठी अंदाजे ५ ते ६ हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी आला असण्याची शक्यता पणन महासंघाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली.


राज्यात ५० पैकी १४ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून, रविवारपर्यंत १५ हजार क्विंटलवर कापूस खरेदी करण्यात आली. सोमवारी उशिरापर्यंत मोजणी सुरू असल्याने यात आणखी ५ ते ७ क्विंटलची भर पडल्याची माहिती आहे.
- राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, पणन महासंघ.

Web Title: Cotton pruchsing increase at Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.