पाऊस लांबल्यास कापसाचा पेरा घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 02:06 PM2019-06-16T14:06:31+5:302019-06-16T14:06:41+5:30

अकोला : मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

 Cotton sowing will decrease if rain is delayed! | पाऊस लांबल्यास कापसाचा पेरा घटणार!

पाऊस लांबल्यास कापसाचा पेरा घटणार!

googlenewsNext

अकोला : मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरही पाऊस न आल्यास पिकात फेरबदल करावे लागणार असून, कपाशीचे सरळ, सुधारित वाण पेरणीसाठी योग्य राहील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी व भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तथापि, विदर्भात यंदा जून महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा संपला तरी पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. २२ जूनपर्यंत हे नक्षत्र राहील. त्यानंतर दुसरे नक्षत्र लागेल. ३० जूनपर्यंत दीड नक्षत्र संपलेले असेल. तोपर्यंत जर मान्सून आला नाही, तर शेतकºयांना पिकात बदल करावे लागणार आहेत.मागील काही वर्षात मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटले आहे. मागील दोन वर्षे तर शेतकºयांना एकरी सरासरी अर्धा ते एक क्विंटलच उत्पादन झाले. म्हणूनच यावर्षी मान्सून वेळेवर येईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. पंरतु यावर्षीही अद्याप मान्सून पोहोचला नाही. आणखी उशीर झाला तर त्याचा परिणाम भूगर्भातील जलसाठ्यावर होईल.
- मान्सून लांबल्यास सरळ वाण पेरा!
मान्सून लांबल्यास शेतकºयांना संकरितऐवजी सरळ, सुधारित कपाशीची पेरणी करावी लागेल. त्यासाठी झाडाची संख्या वाढविणे गरजेचे आहे. म्हणजेच २० टक्के अधिक बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करावा लागेल.
- ११ ते १७ जूनपर्यंत नॉर्मल स्थिती
११ ते १७ जूनपर्यंत २४ वा हवामान आठवडानुसार ही स्थिती नार्मल समजली जाते. त्यानंतर दोन आठवडे पाऊस लांबला तर पिकात बदल करावे लागतात.

- मान्सून येण्याची शक्यता वाढली आहे. ३० जूनपर्यंतही आला तर सामान्य पेरणी करता येईल. त्यानंतर जर आला नाही तर मूग, उडीद पीक पेरणीवर क ाही प्रमाणात परिणाम होईल; पण अलीकडे हवामान बदलाचे चित्र बघितल्यास उशिरा पाऊस होतो आणि पेरणीही उशिरा होते. त्यामुळे शेतकºयांनी चिंंता करू नये .
डॉ. मोहन खाकरे,
ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ,
कृषी विद्यावेता,
डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

Web Title:  Cotton sowing will decrease if rain is delayed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.