कापसाची चोरी; पित्याची मुलाविरुद्ध तक्रार

By admin | Published: December 14, 2015 02:38 AM2015-12-14T02:38:33+5:302015-12-14T02:38:33+5:30

हिवरखेड पोलिसांनी दाखल केला गुन्हा.

Cotton stolen; Complaint against father's son | कापसाची चोरी; पित्याची मुलाविरुद्ध तक्रार

कापसाची चोरी; पित्याची मुलाविरुद्ध तक्रार

Next

हिवरखेड (जि. अकोला): बेलखेड येथे कापूस चोरीप्रकरणी पित्याने दिलेल्या तक्रारीवरून मुलगा व नातवाविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. बेलखेड येथील रहिवासी चंद्रभान जानूजी भटकर यांचा मुलगा भीमराव चंद्रभान भटकर व नातू नीलेश भीमराव भटकर यांनी १३ डिसेंबर रोजी सकाळी १0 क्विंटल कापूस चोरून नेला. याबाबत चंद्रभान भटकर यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलगा व नातू यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३८0 (चोरी), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Cotton stolen; Complaint against father's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.