‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणीत गोंधळ; पराभूत उमेदवारांचा ‘एल्गार’!

By admin | Published: February 25, 2017 02:23 AM2017-02-25T02:23:17+5:302017-02-25T02:23:17+5:30

फेरमतदान घेण्याची मागणी; कलेक्टर बंगल्यावर धडक

Countdown Turbulence Through 'EVM'; 'Elgar' of defeated candidates! | ‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणीत गोंधळ; पराभूत उमेदवारांचा ‘एल्गार’!

‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणीत गोंधळ; पराभूत उमेदवारांचा ‘एल्गार’!

Next

अकोला, दि. २४- महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, भाजप वगळता विविध राजकीय पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी एल्गार पुकारला. राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह पराभूत उमेदवारांनी शुक्रवारी कलेक्टर बंगल्यावर धडक देऊन, मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ईव्हीएमद्वारे मतमोजणी प्रक्रियेत ईव्हीएममध्ये सेटिंग करून निवडणुकीचे निकाल बदलविण्यात आले, असा आरोप करीत, निवडणुकीत पराभूत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी ह्यईव्हीएमह्णद्वारे मतमोजणीतील गोंधळाविरुद्ध ह्यएल्गार पुकारला. भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व शिवसेना इत्यादी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकारी बंगल्यावर धडक देत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. ह्यईव्हीएमह्णद्वारे मतमोजणीत झालेला निर्णय अमान्य असून, ईव्हीएम ताब्यात घेऊन ह्यसीलह्ण करण्यात याव्या व यासंदर्भात सखोल चौकशी करून महानगरपालिका निवडणुकीसाठी मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणीही विविध राजकीय पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवारांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, मदन भरगड, अविनाश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार मुलचंदाणी, भारिप-बमसंचे बालमुकुंद भिरड, बुद्धरत्न इंगोले, वंदना वासनिक, शिवसेनेचे तरुण बगेरे, नंदू ढोरे, नकुल ताथोड, प्रल्हाद ढोरे यांच्यासह पराभूत उमेदवार उपस्थित होते.
एका उमेदवाराला एकच मत; दुसर्‍याला केवळ २0 मते!
महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्र.१३ मध्ये उमेदवार नंदू ढोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ज्या मतदान केंद्रावर मतदान होते, त्या केंद्रावर ढोरे यांना केवळ एक मत मिळाले. तसेच दुसरे उमेदवार पंकज उपाध्ये यांचे व त्यांच्या कुटुंबीयांची मतदान केंद्र क्र.१९ व २0 मध्ये १00 मते आहेत. त्यांनी मतदान केले असताना उपाध्ये यांना केवळ २0 मते मिळाली, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्रावर झालेले मतदान आणि मतमोजणीत ईव्हीएम मशीनद्वारे दाखविण्यात आलेले मतदान, यामध्ये तफावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
फेरमतमोजणीची मागणी फेटाळल्याचा आरोप!
मतमोजणी प्रक्रियेत गोंधळाच्या पृष्ठभूमीवर उमेदवारांकडून फेरमतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे करण्यात आली; मात्र फेरमतमोजणीची मागणी फेटाळण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

Web Title: Countdown Turbulence Through 'EVM'; 'Elgar' of defeated candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.