‘जीएसटी’च्या विरोधासाठी नोव्हेंबरमध्ये देशव्यापी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:45 AM2017-09-28T01:45:07+5:302017-09-28T01:45:17+5:30

अकोला : ‘जीएसटी’च्या जाचक नियमावलींमुळे देशभरातील  व्यापारावर मोठा परिणाम जाणवत आहे. देशभरातून जीएसटी  परिषदेकडे ८५ निवेदन आले असून, प्रत्येक ठिकाणचा व्यापार  ३0 ते ७0 टक्क्यांनी घसरला आहे. जीएसटीत अनेक त्रुटी  असून, त्या दूर कराव्यात, या मागणीसाठी आता देशव्यापी बंद  पुकारला जाणार असून, त्यावर व्यापार्‍यांमध्ये विचार सुरू आहे.  बुधवारी अकोल्यात विदर्भ चेंबर्स ऑफ कॉर्मसची बुधवारी  मासिक बैठक श्रावगी टॉवर्सच्या कार्यालयात घेतली गेली. त्यात  जीएसटीला विरोध दर्शविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात एक  दिवसीय देशव्यापी बंद छेडण्यात येणार असल्यावर चर्चा झाली.

Countrywide closure in November for 'GST' protest | ‘जीएसटी’च्या विरोधासाठी नोव्हेंबरमध्ये देशव्यापी बंद

‘जीएसटी’च्या विरोधासाठी नोव्हेंबरमध्ये देशव्यापी बंद

Next
ठळक मुद्देविदर्भ चेंबर्सच्या मासिक बैठकीत व्यापार्‍यांची आगपाखडब्रजलाल बियाणी यांची पुण्यतिथी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘जीएसटी’च्या जाचक नियमावलींमुळे देशभरातील  व्यापारावर मोठा परिणाम जाणवत आहे. देशभरातून जीएसटी  परिषदेकडे ८५ निवेदन आले असून, प्रत्येक ठिकाणचा व्यापार  ३0 ते ७0 टक्क्यांनी घसरला आहे. जीएसटीत अनेक त्रुटी  असून, त्या दूर कराव्यात, या मागणीसाठी आता देशव्यापी बंद  पुकारला जाणार असून, त्यावर व्यापार्‍यांमध्ये विचार सुरू आहे.  बुधवारी अकोल्यात विदर्भ चेंबर्स ऑफ कॉर्मसची बुधवारी  मासिक बैठक श्रावगी टॉवर्सच्या कार्यालयात घेतली गेली. त्यात  जीएसटीला विरोध दर्शविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात एक  दिवसीय देशव्यापी बंद छेडण्यात येणार असल्यावर चर्चा झाली.
  कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी जीएसटीसंदर्भात  सुरू असलेल्या देशव्यापी हालचालीवर प्रकाश टाकला.  जीएसटी पोर्टलवर अनेक तक्रारी अजूनही सुरूच आहेत. रिटर्न  अपलोड करण्याची कमी क्षमता असलेले नेटवर्क एका खासगी  एजन्सीला दिलेले आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या भरणादरम्यान  या तक्रारी अधिकच वाढत जाणार आहेत, अशी माहितीही  डालमिया यांनी दिली. कॅन्सलेशनच्या तक्रारीतून अजूनही व्या पारी-उद्योजक निघालेले नाहीत. सर्व्हर डाउनच्या तक्रारीतून  बाहेर पडण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. 
या सर्व समस्येतून बाहेर पडण्यासाठी नोव्हेंबरमध्ये सरकारचे  लक्ष वेधण्यासाठी नोव्हेंबरमध्ये एक दिवसीय व्यापार बंद  ठेवण्याचा विचार आहे. जिल्हा पातळीच्या उत्पादन शुल्क  कार्यालयावर आणि जीएसटीच्या कार्यालयावर व्यापारी मोर्चा  घेऊन जातील. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले  जाणार आहे. यावर विचारविनियम करण्यात आले.

ब्रजलाल बियाणी यांची पुण्यतिथी
माजी केंद्रीय मंत्री आणि विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसचे संस्थापक  ब्रजलाल बियाणी यांची पुण्यतिथी चेंबर्सच्या कार्यालयात  बुधवारी सायंकाळी साजरी झाली. महापालिकेचे महापौर विजय  अग्रवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात  आले. याप्रसंगी चेंबर्सचे ज्येष्ठ सदस्य वसंत बाछुका, अध्यक्ष  विजय पनपालिया, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया,  सचिव निकेश गुप्ता, राजकुमार बिलाला, रमाकांत खंडेलवाल,  जी.एल. डालमिया, कृष्णा शर्मा, दिलीप खत्री आदी प्रामुख्याने  उपस्थित होते.

Web Title: Countrywide closure in November for 'GST' protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.