क्रिकेट सट्टेबाजास न्यायालयाने फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:37 AM2017-10-07T02:37:18+5:302017-10-07T02:37:21+5:30
अकोला: न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या धनादेश अनादर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने क्रिकेट सट्टेबाज श्रेय सुनील चांडक याला शुक्रवारी चांगलेच फटकारले. एकाच न्यायालयात खटले चालविण्याची मागणीसुद्धा न्यायालयाने धुडकावून लावली.

क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी नागरिकांकडून लाखो रुपये श्रेय चांडक घेत होता. हे पैसे परत करण्याच्या मोबदल्यात सुरक्षा ठेव म्हणून स्वत:च्या स्वाक्षरीचे तेवढय़ाच रकमेचे धनादेशही संबंधितांना देत होता. पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदारांना श्रेय चांडककडून मिळालेले धनादेश बँकांमध्ये अनादर झाल्यामुळे तक्रारदारांनी त्याच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. मुंबईतील कल्याणमध्ये एक व अकोला न्यायालयात तीन असे चार खटले श्रेय चांडक आणि त्याच्या आईविरोधात सुरू आहेत. स्वत:चे सर्व चारही प्रकरणे एकाच न्यायालयात चालवावीत, यासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात दोन महिन्यांआधी अर्ज केला होता. या अर्जावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायाधीश ख्वाजा यांनी श्रेय चांडकला फटकार लगावत त्याने केलेल्या अर्जानुसार कायद्यामध्ये वेगवेगळय़ा न्यायालयातील खटला एकाच ठिकाणी चालविण्याची तरतूद असल्याचे बजावले.