अकोला जिल्ह्यात ५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड लसीकरणाचे प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 10:39 AM2020-12-20T10:39:02+5:302020-12-20T10:40:39+5:30
Covid 19 vaccination जिल्हास्तरीय कार्यक्रमात ५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
अकोला: जिल्ह्यात कोविड लसीकरणाची तयारी केली जात असून, पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय कार्यक्रमात ५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यासह जिल्ह्यातही कोविड लसीकरणाची पूर्वतयारी केली जात आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हास्तरीय कोविड लसीकरण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात या २४ डिसेंबरपर्यंत तालुकास्तरावर कोविड लसीकरण प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती डॉ. मनीष शर्मा यांनी सांगितले.