कैदी रुग्णांसाठी जिल्हा कारागृहात ‘कोविड केअर सेंटर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 10:24 AM2020-06-28T10:24:22+5:302020-06-28T10:24:45+5:30

२६ जूनपासून जिल्हा कारागृहातील एका इमारतीमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ कार्यान्वित करण्यात आले आहे.

'Covid Care Center' in District Jail for inmate patients! | कैदी रुग्णांसाठी जिल्हा कारागृहात ‘कोविड केअर सेंटर’!

कैदी रुग्णांसाठी जिल्हा कारागृहात ‘कोविड केअर सेंटर’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कोरोनाबाधित कैदी रुग्णांसाठी जिल्हा कारागृहात ‘कोविड केअर सेंटर’ कार्यान्वित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २५ जून रोजी दिला. त्यानुसार २६ जूनपासून जिल्हा कारागृहातील एका इमारतीमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ कार्यान्वित करण्यात आले आहे.
जिल्हा कारागृहातील १८ कैद्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे २४ जून रोजी आढळून आले. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग विचारात घेता, कैद्यांना बाहेरील रुग्णालयात दाखल करण्याकरिता आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त आणि जागा उपलब्ध होणे अडचणीचे असल्याने, जिल्हा कारागृहातील कोरोनाबाधित कैदी रुग्णांंकरिता कारागृहातील एका इमारतीमध्ये ‘कोविड केअर सेंटर ’कार्यान्वित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
कोविड केअर सेंटरकरिता लागणारी कारागृहातील संबंधित इमारत जिल्हा कारागृह अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ताब्यात देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले होते.
त्यानुसार जिल्हा कारागृहातील कोरोनाबाधित कैदी रुग्णांसाठी कारागृहातील एका इमारतीमध्ये २६ जूनपासून ‘कोविड केअर सेंटर’ कार्यान्वित करण्यात आले. या कोविड केअर सेंटरमध्ये कारागृहातील कैदी रुग्णांवर उपचार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा कारागृहातील कोरोनाबाधित कैदी रुग्णांसाठी कारागृहातील एका इमारतीमध्ये २६ जूनपासून ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. कारागृहातील सर्व कैदी आणि कर्मचाºयांची आरोग्य तपासणी व घशातील स्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
-विजय लोखंडे,
तहसीलदार, अकोला.

Web Title: 'Covid Care Center' in District Jail for inmate patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.