विद्यार्थ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी कोविड ऑनलाइन संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:56+5:302021-05-29T04:15:56+5:30
ऑनलाइन संवादामध्ये विद्यार्थी व पालकांना मिरज येथील डॉ. कल्पना काळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी कोरोनाची लक्षणे, वस्तुस्थिती व उपचार याबाबत, ...
ऑनलाइन संवादामध्ये विद्यार्थी व पालकांना मिरज येथील डॉ. कल्पना काळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी कोरोनाची लक्षणे, वस्तुस्थिती व उपचार याबाबत, पुण्याचे डॉ. माधव धर्मे यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तिसऱ्या लाटेची तयारी, अमरावतीचे डॉ. रूपेश माकोडे यांनी कोरोनाकाळात येणाऱ्या अडचणी, गैरसमज यावर, मिरजच्या डॉ. नयना अस्वार यांनी कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक ताण व पालकांनी घ्यावयाची काळजी, अकोल्याच्या डॉ. श्वेता भावे यांनी कोरोना लसीकरण गरज व समज, गैरसमज याबाबत तर पुण्याच्या डॉ. कनिका खांजोडकर यांची प्रतिकार शक्तिवर्धक आहाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. संवाद कार्यक्रमामध्ये लंडन, बंगळुरू, दिल्ली, भोपाळ, वेल्लूर, पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पालक, विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक डॉ. रवींद्र भास्कर यांनी, संचालन डॉ. प्रीती काटोले यांनी केले तर आभार डॉ. पांडुरंग धांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनकसिंह राजपूत, रवींद्र इनामदार, विजय भड, अनंत डुमरे, अनिल जोशी, चंद्रकांत वाळके, सुनील वानखेडे, मनोज रहागंडाले, हेमराज बिसेन, प्रमोद जोशी, श्रीकांत शिनगारे, श्वेता ठाकूर आदींनी प्रयत्न केले.