जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:41+5:302021-03-25T04:18:41+5:30
अकोला: जिल्हा परिषदेत बुधवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. ...
अकोला: जिल्हा परिषदेत बुधवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्याची आवश्यकता असून, त्यामध्ये विविध शासकीय कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार २४ मार्च रोजी जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, १५० कर्मचारी कोरोनाबधित नसल्याचे निष्पन्न झाले आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
विनामास्क फिरल्यास प्रशासकीय
कारवाई; सीएओंचा इशारा!
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्या जिल्हा कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सोईओ) सौरभ कटीयार यांनी बुधवारी दिला.