परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची कोविड चाचणी करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:53+5:302021-04-06T04:17:53+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. इयता बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून आणि इयत्ता दहावीची परीक्षा २९ ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
इयता बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून आणि इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरु होत आहे. त्याअनुषंगाने परीक्षा पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांची कोविड चाचणी तातडीने करुन घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच परीक्षा केंद्र सॅनिटायझर करण्यासह लांब अंतरावरुन व बाहेरगाहून परीक्षेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बसेसची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. दहावी व बारावी परीक्षेची जिल्ह्यात करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी बैठकीत दिली.
कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या
घरातील विद्यार्थ्यांची यादी मागवा !
इयत्ता बारावी व दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या घरातील विद्यार्थ्यांची गावनिहाय यादी संंबंधित आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांकडून १५ एप्रिलपर्यंत मागविण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.