कोविड लसीकरण मोहिमेचा वेग पुन्हा वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:37+5:302021-06-21T04:14:37+5:30
अशी असतील केंद्रे महापालिका क्षेत्र - १० ग्रामीण रुग्णालय - ०५ पीएचसी - ३१ कोविशिल्ड लसीला प्राधान्य ...
अशी असतील केंद्रे
महापालिका क्षेत्र - १०
ग्रामीण रुग्णालय - ०५
पीएचसी - ३१
कोविशिल्ड लसीला प्राधान्य
कोविड लसीरण मोहिमेंतर्गत कोव्हॅक्सिनऐवजी कोविशिल्डला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यल्प हाेत असल्याने दुसऱ्या डोससाठी मोठी अडचण निर्माण होते. दोन्ही डोसमधील अंतर वाढू नये, तसेच नागरिकांना अडचणीचे जाऊ नये, या अनुषंगाने कोविशिल्ड लसीला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. कोविशिल्ड लसीचा दर आठवड्यात पुरवठा होत असल्याने तुटवडाही भासणार नसल्याचे आरोग्य यंत्रणेमार्फत सांगण्यात येत आहे.
लसीकरणाविषयी जनजागृतीची गरज
मागील काही दिवसांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. ही गती वाढविण्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये कोविड लसीकरणाच्या फायद्यांविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.