कोविड लसीकरण जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:24 AM2021-02-27T04:24:20+5:302021-02-27T04:24:20+5:30
या मोहिमेंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात, तसेच शहरी व ग्रामीण भागात कोविड लसीकरण व आत्मनिर्भरबाबत प्रचार व प्रसिद्धी राबविण्यात येणार आहे. ...
या मोहिमेंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात, तसेच शहरी व ग्रामीण भागात कोविड लसीकरण व आत्मनिर्भरबाबत प्रचार व प्रसिद्धी राबविण्यात येणार आहे. या चित्ररथ निर्मितीकरिता जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले आहे. डिजिटल रथाद्वारे जिल्ह्यात दरदिवशी आठ ते दहा गावांत प्रचार करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल व्हॅन, तसेच कलापथकाद्वारे गावागावांमध्ये कोरोनाविषयक संदेश व लसीकरणाचा प्रसार होईल. या मोहिमेमुळे लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर होतील. आत्मनिर्भर योजनेंतर्गत ‘व्होकल फॉर लोकल’ या मोहिमेला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यांनी केले. या मोहिमेकरिता अंबादास यादव, श्रीकांत जांभुलकर यांनी संयोजन केले.